27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे!

मणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे!

मोठे रॅकेट उद्ध्वस्त; अनेकांना अटक

Google News Follow

Related

संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना खोटे आधार कार्ड व मतदान ओळखपत्र जाहीर करण्याचे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे विशेष पथक यावर नजर ठेवून असून नुकतीच काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात पोलिसांनी म्यानमारमधून आलेल्या दोन घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडून दोन बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले की, अशा अनेक प्रकरणांत पोलिसांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, रॅकेट चालवणारे गुन्हेगारांनी सांगितल्यानुसार, हे बेकायदा प्रवासी त्यांच्या पत्त्यावर कोणत्याही ठिकाणाचे नाव नमूद करू शकतात.

दक्षिण मणिपूरमध्ये सध्या राज्य सरकारकडून बनावट आधार आणि मतदार ओळखपत्रासह बनावट ओळखपत्र बनवणाऱ्या बेकायदा प्रवाशांना पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे. ही समस्या केवळ मणिपूरपर्यंतच सीमित नाही. तर, संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही धोकादायक आहे.

मणिपूरमध्ये जुंटा दल आणि लोकशाही समर्थक आंदोलकांमधील हिंसाचारामुळे पळणारे म्यानमारचे शरणार्थींची बायोमेट्रिक्स चाचणी केली जात आहे. अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या या बायोमेट्रिक चाचण्या करू न इच्छिणारे बेकायदा प्रवासी बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या टोळीशी संपर्क साधतात. याच टोळीविरोधात सरकारकडून सध्या कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा:

चांद्रयान- ४ चंद्रावर पोहचण्यापूर्वीच रचणार इतिहास; यानाचे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवणार

अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिकेने मिळवले फायनलचे तिकीट

उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी!

प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!

सन २०१८मध्येदेखील सीमेकडील शहरात जिरभीम आणि मोरेह यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या दोन बनावट आधार कार्ड रॅकेटमध्ये सहभागी झालेल्या आरोपाप्रकरणी १० जणांना अटक केली होती. अटक केलेल्या १० जणांपैकी नऊ जण म्यानमारचे बेकायदा मुस्लिम प्रवासी आहेत. तमिळनाडूतील एका भारतीय महिलेने परीथा बेगमलाही अटक केली होती. पोलिसांनी मोरेहमध्ये मोहम्मद तोम्बा नावाच्या व्यक्तीच्या घरी छापा मारला होता आणि दोन लॅपटॉप, चार आधार कार्ड, एक प्रिंटर मशिन, एक लॅमिनेटिंग मशिन, प्लास्टिक शीट, डीव्हीडी आणि फोटो पेपर जप्त केले होते.

अशाप्रकारे मे, २०१८मध्ये बनावट आधार्ड कार्डासह सुमारे ९८ बेकायदा प्रवाशांना इम्फाळ शहरातून अटक केली होती. ऑक्टोबर, २०२१मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी मणिपूरच्या टेंग्नोपाल जिल्ह्यातून भारत-म्यानमार सीमेवर बनावट आधार कार्डसह प्रवास करणाऱ्या ब्रह्मदेशाच्या २४ बेकायदा प्रवाशांना अटक केली होती. ते दिल्लीला जाणारे विमान पकडण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या वर्षी काकजिंग जिल्ह्यात कुकी नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाल्यानंतर एक हजारांहून अधिक बनावट मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा