राज्यातील शहरे अमली पदार्थमुक्त व्हावीत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत निर्देश दिले आहेत. या शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामं बुलडोझरने नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या कारवायांना वेग आला आहे. अशातच आता मुख्यमंत्री शिंदेनी ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करा तसेच शहरातील अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2024
अमली पदार्थांमुळे तरुणाईचं मोठं नुकसान होत असून हा विळखा तातडीनं रोखणं महत्त्वाचं आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
हे ही वाचा:
प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!
काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; ‘हे’ मुद्दे गाजण्याची शक्यता
‘ओवेसीची जीभ छाटा अन पारितोषिक घेवून जा’
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना शहरातील अवैध पबच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. याशिवाय अवैध पबसह बांधकाम नियमांचे उल्लंघन केलेल्या अन्य इमारतींवरही बुलडोझर चालवावेत असे निर्देश दिले आहेत.