ओक्लाहोमा येथे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला त्याच्या तोंडावर ठोसे मारल्याची घटना घडली. त्याला इतके ठोसे मारले गेले की त्यात त्याचा मृत्यू झाला. हेमंत मिस्त्री (५९) असे त्यांचे नाव आहे. २२ जून रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. हेमंत मिस्त्री हे मोटेल मॅनेजर होते.
मिस्त्री हे मुळचे गुजरातचे आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव रिचर्ड लुईस आहे. त्याला मिस्त्री यांनी त्यांची जी मालमत्ता होती ति सोडण्यास सांगितले हिते. त्यानंतर त्याने मिस्त्री यांना धक्काबुक्की केली. त्याच्या तोंडावर जोरजोरात ठोसे मारण्यात आल्याने ते बेशुद्ध पडले.
हेही वाचा..
क्रिकेटमधील DLS पद्धतीचे निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना सीबीआयकडून अटक
आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना मारहाणीची होती भीती
त्यांना सायंकाळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा २३ जून रोजी रात्री ७.४० च्या दरम्यान मृत्यू झाला. लुईस नंतर एस मेरिडियन अव्हेन्यूच्या १९०० ब्लॉकमधील एका हॉटेलमध्ये पोलिसांना सापडला. तेथूनच त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला ओक्लाहोमा काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
याबद्दल स्थानिक माध्यमांना पोलिसांनी सांगितले की, संशयिताला मालमत्ता सोडण्यास का सांगितले गेले ? याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र मिस्त्री यांच्या घरातून तो बाहेर पडण्यास इच्छुक नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे.