24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषलैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

कर्नाटक पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार सूरज रेवण्णा याला रविवारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. जेडीएस कार्यकर्त्याने सूरज रेवण्णा विरोधात गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. तेथून रविवारी(२३ जून) सकाळी त्याला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेला सूरज रेवण्णा हा प्रज्वल रेवण्णाचा सख्खा भाऊ आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णालाही अटक करण्यात आली आहे. आता सूरज रेवण्णाला अटक केल्याने कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा पोलीस ठाण्यात जेडी(एस) कार्यकर्त्याने सूरजविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या संसदेतही पाक कर्णधार बाबर आझम ट्रोल!

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखाची हकालपट्टी!

मेरठच्या तुरुंगात कैद रवी अत्री नीट पेपरफुटीचा सूत्रधार असण्याची शक्यता!

मान्सून जुलैपर्यंत वायव्य भारत व्यापेल!

पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, १६ जून रोजी सुरज रेवाण्णाने सदर कार्यकर्त्याला फार्महाऊसवर बोलविले होते. फार्महाऊसवर सदर तरुणावर लैंगिक बळजबरी करण्यात आली. अत्याचारानंतर राजकारणात चांगले पद दिले जाईल असे आश्वासन सुरजने पीडित तरुणाला दिले. पीडित तरुणाने तक्रारीत म्हटले आहे की, या घटनेनंतर सूरजला याबाबत विचारला केली. यावर “काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल” असे उत्तर सूरजने दिल्याचे त्याने म्हटले.

तक्रारीच्या आधारे, होलेनारसीपुरा पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार सूरज रेवण्णा विरुद्ध आयपीसी कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सूरज रेवण्णाला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा