24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय

सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय

Google News Follow

Related

भारताने टी २० विश्वचषक स्पर्धेतील सुपर आठची मोठ्या झोकात सुरुवात केली. गुरुवारी बार्बाडोसमध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी मात करत अन्य संघांना इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचा पराभव करून भारताने या स्पर्धेत सलग आठ सामन्यांत विजयाची नोंद केली. या विजयासह भारातने आता सुपर आठच्या गुणतक्त्यात चांगल्या धावगतीसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

फलंदाजांना साथ न देणाऱ्या खेळपट्टीवर भारताने १८१ धावसंख्या उभारली. जसप्रीत बुमराह या सामन्याचा स्टार खेळाडू ठरला. त्याने चार षटकांत अवघ्या सात धावा देऊन तीन विकेट खिशात घातल्या. कुलदीपच यादवच्या रूपात आणखी एक फिरकीपटू खेळवण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला. कुलदीप, रवींद्र जाडेजा आणि अक्सर पटेल यांनी चार विकेट घेतल्या.

जसप्रीत बुमराहने रहमनुल्लाह गुरबाझ याला ११ धावांवर बाद केले. इब्राहिम झदरान एक धावावर असताना त्याचा झेल विराट कोहलीकडून सुटला. मात्र त्याने फारसा फरक पडला नाही. रोहित शर्माने अक्सर पटेल याला चौथ्या षटकात पाचारण केले. त्यानंतर या डावखुऱ्या फिरकीपटूने निर्धाव षटक टाकून इब्राहिमला आठ धावांवर बाद केले. बुमराहला पॉवरप्लेमध्ये आणखी एक षटक टाकण्याची संधी देण्यात आली आणि त्याने या संधीचे सोने केले. त्याने धोकादायक हझरतुल्लाह झझाई याला दोनवर बाद केले. बुमराह याच्या धोकादायक गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचे फलंदाज निष्प्रभ ठरले.

सहा षटकांत केवळ ३५ धावाच त्यांना जमवता आल्या. अफगाणिस्तानचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. थोड्या थोड्या कालावधीत त्यांच्या विकेट एकेक करून बाद होत गेल्या. कुलदीपने दोन तर, जाडेजाने एक विकेट घेतली. तर, अर्शदीप सिंगने शेवटच्या फलंदाजांना बाद करून आपली कामगिरी चोख बजावली. त्यामुळे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ २० षटकांत १३४ धावांतच बाद झाला.

हे ही वाचा:

दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक

‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’

राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!

कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सूर्यकुमार यादव याने मात्र त्याच्यावरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्याने २७ चेंडूंत ५३ धावा केल्या. अफगाणइस्तानने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना झटपट बाद करून कामगिरी फत्ते केली. ऋषभ पंत याने ११ चेंडूंत २० धावा केल्या आणि अफगाणिस्तानपुढे १८१ धावांचे लक्ष्य समोर ठेवले. भारताचा आता पुढील सामना २२ जून रोजी अँटिग्वा येथे बांगलादेशविरुद्ध होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा