काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी आपल्या कार्यकर्त्याकडून पाय धुतल्याच्या प्रकरणावरून त्यांच्यावर अजूनही टीका केली जात आहे. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला असून गुलामीचा नवा चेहरा म्हणजे नाना पटोले आहेत, अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे बोलत होते.
नाना पटोलेंच्या कृतीवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही एक निर्लज्ज अशी घटना आहे. नाना पटोलेंचा बुद्धिभेद झाला आहे. इंग्रजांच्या कार्यकाळात अशी लोक राहत होती आणि तेव्हा गुलामगिरीची भाषा होती. गुलामीचा नवा चेहरा म्हणजे नाना पटोले आहेत. इंग्रजांचे दिवस पुन्हा आणण्याचे हे प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांकडून, शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे पाय धुवून घेणे उचित नाहीये, असे बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा:
गोमांसवरून मुंबईच्या मीरारोडमध्ये गोंधळ !
राम मंदिरात तैनात असलेल्या जवानाचा संशयास्पद गोळी लागून मृत्यू!
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली
ते पुढे म्हणाले, नाना पटोले यांनी आपल्या पदाचा आणि व्यक्ती म्हणून स्वतःचाही अपमान केला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे शोभणारे नाहीये. त्यामुळे त्यांनी याच आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्यांचा जो बुद्धिभेद झाला आहे तो दुरुस्त करून घेतला पाहिजे.