प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा (हिंदू साम्राज्य दिन) राज्यभरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला पार पडला होता. स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर झाला होता. हा दिवस भारताच्या इतिहासासह जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ आणि ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक सोहळा हा न भूतो न भविष्यति असा होता. राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला.
राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. साधारण सहा दिवस विविध समारंभ होत होते. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ पार पडले. तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला.
हे ही वाचा..
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला गेला. ३२ मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. प्रजेने या त्यांच्यातल्या राजाला आशीर्वाद देत ‘शिवराज की जय’च्या घोषणा दिल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. यावेळी महाराजांनी दान देखील केले.