देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान सन्मान परिषदे’त ‘पीएम किसान सन्मान निधी योजने’चा १७ वा हफ्ता जारी केला आहे. त्यामुळे देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत. दोन हजार रुपयांचा हा हफ्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी रविवार, ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर १० जून रोजी नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी हे थेट कामाला लागले. त्यांनी लगेचच मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे देशातील शेतकऱ्यांसाठी. त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी करण्यात आला.
हे ही वाचा:
आमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकले…
मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील ‘मन की बात’चा पहिला एपिसोड ३० जूनला !
वसईत तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या
नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांकडून पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजपाने घेतला समाचार!
‘पीएम किसान सन्मान निधी योजने’चा १६ वा हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आला होता. त्यानंतर देशातील करोडो शेतकरी ‘पीएम किसान सन्मान निधी योजने’च्या १७ व्या हफ्त्याची आतुरतेने वाट बघत होते. दरम्यान, शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान निधी योजने’च्या १७ व्या हफ्त्याची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.