शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवसांच्या मंगळवारी शेअर बाजार उघडताच बाजाराने दमदार उसळी घेतली. शेअर बाजाराने नवीन विक्रम नोंदवत मोठी उसळी घेतली आहे. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ३३४.०३ अंकाची वाढ पाहायला मिळाली ज्यामुळे आतापर्यंतची सार्वकालीन उच्चांकी पातळी गाठत सेन्सेक्स निर्देशांकाने ७७,२३५.३१ टप्पा गाठला. तर निफ्टीमध्ये १०८.२५ अंकाची वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे निफ्टी निर्देशांक पहिल्यांदाच २३,५७३ वर पोहोचला.
लोकसभा निवडणूकीच्या काळात शेअर बाजारात मोठे चढउतार दिसून आले होते. या सर्व घडामोडी होत असताना बाजार मोठा पल्ला गाठेल, असा विश्वास अनेक तज्ञांनी व्यक्त केला होता. सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. तर मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी रिॲलिटी आणि ग्राहपयोगी वस्तू याक्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक आघाडी घेतली.
हे ही वाचा:
मानवी चूक, सिग्नलकडे दुर्लक्ष, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड…
भाऊ, वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत हिंदू बहिणींवर लग्नासाठी दबाव!
अण्वस्त्रांच्या संख्येत भारत पाकिस्तानच्या पुढे
इटलीच्या किनारपट्टीनजीक स्थलांतरितांचे जहाज बुडून ११ जणांचा मृत्यू
ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यामध्येही ०.५ ट्कक्यांची वाढ दिसून आली. ओएनजीसी शेअरने १.२ टक्क्यांची वाढ झाली. केंद्र सरकारने १५ जून पासून कच्च्या इंधनावरील विंडफॉल कर ५,२०० रुपयांवरून ३,२५० रुपये प्रति मेट्रिक टनावर आणल्यामुळे त्याचाही प्रभाव बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सरकारी कंपन्यांमध्येही एक टक्क्याची वाढ पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, आयआरसीटीसी, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.