पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ सोमवारी पहाटे मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्याने किमान नऊ जण ठार तर ५०हून अधिक जखमी झाले. त्यातून बचावलेल्या प्रवाशांनी त्यांच्यावर बेतलेला भीषण अनुभव कथन केला.
सियालदह-कांचनजंगा एक्स्प्रेसचा एक प्रवासी सांगत होता, ‘आमची ट्रेन जेव्हा न्यू जलपायगुडीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपानी येथे पोहोचली, तेव्हा खूप हळू चालत होती,’ असे त्याने सांगितले.
तर, दुसऱ्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, अचानक, तीव्र धक्क्याने मोठा आवाज आला, ज्यामुळे ट्रेन अचानक थांबली. ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर, प्रवाशाने पाहिले की एक मालगाडी त्यांच्या रुळांवर मागील बाजूने धडकली आहे. ‘आम्ही चहा घेत होतो, तेव्हा ट्रेन अचानक धक्क्याने थांबली,’ एका प्रवाशाने सांगितले.
कुटुंबासह प्रवास करणारी एक गर्भवती महिला या धडकेमुळे तिच्या सीटवरून पडली. ती म्हणाली, ‘जणू मला भूकंप झाल्यासारखेच वाटले. आम्हाला स्वतःला नेमके काय झाले आहे, हे समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला,’ ती म्हणाली. कांचनजंगा एक्स्प्रेसच्या एस ६ कोचमध्ये असलेल्या आगरतळा येथील एका व्यक्तीने अचानक धक्का बसल्याचे सांगितले. ‘माझी पत्नी, मूल आणि मी कसा तरी डब्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झालो. बचाव कार्यही उशिरा सुरू झाले,’ असे या प्रवाशाने सांगितले.
हे ही वाचा:
‘मैतेई-कुकी समाजाशी केंद्र सरकार चर्चा करणार’
राहुल गांधींकडून रायबरेलीची निवड; प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार
महाराष्ट्रात सुरू झालाय ‘फेक नरेटीव्ह सिझन-२
पोलीस भरतीची प्रक्रिया १९ जूनपासून होणार सुरु, गैरप्रकार आढळल्यास होणार गुन्हा दाखल!
रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली, चौकशी सुरू
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघाताच्या कारणाची चौकशी सुरू केली आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या कारणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. आदल्या दिवशी, रेल्वे बोर्डाच्या चेअरपर्सन जया वर्मा सिन्हा यांनी अपघाताचे प्राथमिक कारण सांगितले होते. अपघातात जखमी झालेल्या मालगाडीच्या लोको पायलटच्या चुकीमुळे ही टक्कर झाली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. मालगाडीच्या लोकोपायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केले असावे आणि आगरतळा ते सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला ती धडकली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तवला.