नुकतीच जी-७ शिखर परिषद पार पडली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीला गेले होते. दरम्यान, इटली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांची भेट झाली होती. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर केरळ काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या प्रसंगाची खिल्ली उडवली होती. पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचा पोप यांच्यासोबतचा फोटो आणि “शेवटी पोप यांना देवाला भेटण्याची संधी मिळाली” अशी टिप्पणी केलेली होती. यानंतर काँग्रेसवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. सर्वत्र टीका झाल्यानंतर काँग्रेसने माघार घेत सावध भूमिका घेतली आहे.
काँग्रेस पक्षाने ही पोस्ट हटवत ख्रिश्चन समुदायाची माफी मागितल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्या इटलीतील जी-७ शिखर परिषदेत झालेल्या भेटीची खिल्ली उडवलेल्या केलेल्या पोस्टमुळे भाजपकडून टीका करण्यात येत होती. काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि पोप या दोघांचाही अपमान केल्याचा आरोप भाजपने करत आक्रमक पवित्रा घेतला होता.
हे ही वाचा:
जगातील सर्वांत उंच रेल्वेपुलावरून धावली ट्रेन!
‘भाजपवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही’
९०हून अधिक देशांची युक्रेनमधील शांततेसाठी चर्चा!
प. बंगालमध्ये मालगाडीची कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक; चार जणांचा मृत्यू
केरळ भाजपाचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केरळ काँग्रेसचे अकाऊंट हे कट्टर इस्लामवादी किंवा शहरी नक्षलवाद्यांनी चालवलेले दिसते, राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद आणि अपमानास्पद मजकूर पोस्ट करणे सुरूच ठेवले आहे. आता ते आदरणीय पोप आणि नक्षलवाद्यांची खिल्ली उडवण्यासही पुढे आले आहेत. केरळ भाजपाचे सरचिटणीस जॉर्ज कुरियन म्हणाले की, पोस्ट आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी आहे, विशेषत: केरळमध्ये, जिथे ख्रिश्चन धर्म हा तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. भाजपा आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी आरोप केला की, काँग्रेसचा इतर धर्मांना अपमानित करण्याचा इतिहास आहे आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.