दिंडोशी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी बाजी मारत उबाठाच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव केला. परंतु, या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप अजूनही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या वादात रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याची एंट्री झाली आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. ईव्हीएम मशीन मोबाईलद्वारे खरंच हॅक केले जाऊ शकते का?, यावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस आहे. तसेच त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नाही. त्यामुळे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
वंदना सूर्यवंशी पुढे म्हणाल्या की, डेटा कम्पॅलेशन सिस्टीम आणि ईव्हीएम हे वेगवेगळं आहे. ईव्हीएमशी डेटा कम्पॅलेशन सिस्टीमद्वारे केवळ वेबसाईटवर डेटा टाकला जातो, त्याच्याशी संबंधित काही ओटीपी मोबाईलवर येतो, त्यासाठी काही मोबाईल होते, त्यापैकीच एक म्हणजे डेटा ऑपरेटर गुरव यांच्याकडेही मोबाईल होता. आरोपी विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा:
विधानसभेपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपणार!
बाबरी मस्जिद नाही तर आता ‘तीन घुमट रचना’!
बांगलादेशच्या सीमेवरून महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्यांची घुसखोरी
ईव्हीएम मशीन हॅक केले जाऊ शकते का?, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर महिला अधिकारी म्हणाल्या की, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. त्याला कुठलीही वायर किंवा वायरलेस कनेक्टीव्हीटी नसते. ईव्हीएम प्रोग्रामेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, ते स्वतंत्र आहे. मोबाईल असणं हा वेगळा भाग असून मोबाईलचा ईव्हीएमशी कुठलाही संबंध नसल्याचे वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम हॅक करत येत नाही. मात्र, यानंतर उबाठा काढून काय प्रतिक्रिया येते ते पहावे लागेल.