25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींनी ‘ग्लोबल साऊथ’चे नेते म्हणून भारताची प्रतिमा केली मजबूत

पंतप्रधान मोदींनी ‘ग्लोबल साऊथ’चे नेते म्हणून भारताची प्रतिमा केली मजबूत

Google News Follow

Related

इटलीच्या अपुलिया भागात शुक्रवारी आयोजित ग्रुप ऑफ सेव्हन शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ग्लोबल साऊथचे नेता म्हणून भारताची प्रतिमा अधिक मजबूत केली आहे. गेल्या दशकात भारताच्या जी-२० अध्यक्षतेदरम्यान ग्लोबल साऊथच्या आवाजाला बळकटी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवड्यातील सुरुवातीला पदभार सांभाळल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यादरम्यान विकसनशील देशांचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या जागतिक मंचाची निवड केली.

‘जगभरातील दक्षिणेकडचे देश जागतिक अनिश्चितता आणि तणावाची किंमत मोजत आहेत. भारताने या ग्लोबल साऊथच्या देशांची प्राथमिकता आणि समस्यांना जागतिक मंचावर ठेवणे ही आम्ही जबाबदारी मानली आहे,’ असे मोदी यावेळी म्हणाले. स्वतःच्या कार्यकाळात भारताद्वारे स्वतःला आफ्रिकेच्या सर्वांत चांगल्या मित्राच्या रूपात मजबूतपणे स्थापन करण्यासह पंतप्रधान मोदी यांनी आफ्रिकेप्रति भारताच्या कटिबद्धतेवर जोर दिला.

‘आम्ही या प्रयत्नांत आफ्रिकेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आम्हाला अभिमान आहे की, भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२०ने आफ्रिकी संघाला कायमस्वरूपी सदस्य बनवले. भारत सर्व आफ्रिकी लोकांना आर्थिक आणि सामाजिक विकास, स्थिरता आणि सुरक्षेत सर्व आफ्रिकी देशांना योगदान देत आहेत आणि आम्ही असे कायमच करू,’ अशी ग्वाही मोदी यांनी जी-७ कार्यक्रमात जमलेल्या जागतिक नेत्यांना दिली.

शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर काही तासांतच जर्मन चॅन्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी बोल्गो एग्नाजिया येथे आंतरराष्ट्रीय मंचावर उगवते देश आणि ग्लोबल साऊथचा आवाज पुढे नेणाऱ्या भारतीय पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे समर्थन केले. ‘त्यांनी जी-७ एक्लूझिव्ह क्लब नाही. म्हणूनच जे आम्ही एल्माऊमध्ये सुरू केले तेच आम्ही अपुलिया येथे सुरू ठेवले आहे आणि ग्लोबल साऊथच्या अनेक प्रतिनिधींशी चर्चा केली. भविष्यात हेच सुरू राहणे अपेक्षित आहे. कारण आम्हाला अशी भागीदारी हवी आहे, ज्यात सर्वांना लाभ होईल,’ अशी पोस्ट स्कोल्ज यांनी ‘एक्स’वर केली.

पंतप्रधान भलेही सन २०४७पर्यंत विकसित भारत बनवण्याचे लक्ष्य घेऊन पुढे चालत असतील. मात्र पंतप्रधान मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की, ग्लोबल साऊथसोबत सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात अधिक गती मिळणार आहे.

हे ही वाचा..

मणिपूरमध्ये हिंसाचार; मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळ भीषण आग

दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईदरम्यान आठ इस्रायली सैनिक ठार

पाऊस आला धाऊन सामना गेला वाहून! भारताचा गटसाखळीतील शेवटचा सामना रद्द

निवडणूक होताच काँग्रेसचा खरा चेहरा उघड; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ

मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे भारत ग्लोबल साऊथ आणि विकसनशील देशांया हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहील, असा संदेश मिळाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा