25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषनिवडणूक होताच काँग्रेसचा खरा चेहरा उघड; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ

निवडणूक होताच काँग्रेसचा खरा चेहरा उघड; कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ

निर्णयानंतर भाजपाने साधला निशाणा

Google News Follow

Related

कर्नाटकमध्ये सर्वसामान्यांना काँग्रेस सरकारकडून मोठा दणका मिळालेला आहे. राज्य सरकारने १५ जून पासून पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देणार असे म्हणत पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निवडणुका पार पडताच हे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांनी मात्र राज्य सर्कारेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटक राज्य सरकारने १५ जूनपासून पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे कर्नाटकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अंदाजे ३ आणि ३.०५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील कर्नाटक विक्रीकर (KST) २५.९२ टक्क्यांवरून २९.८४ टक्के करण्यात आला आहे. तर, डिझेलवरील कर्नाटक विक्रीकर १४.३ टक्क्यांवरून १८.४ टक्के करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सार्वत्रिक निवडणुकांनंतर पेट्रोल- डिझेलचे दर वाढवणारे काँग्रेसप्रणीत कर्नाटक हे पहिले राज्य ठरले आहे. कोविड-१९ महामारीनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागील भाजप सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर १३.३० रुपये आणि डिझेलचे दर १९.४० रुपये प्रति लिटरने कमी केले तेव्हा नोव्हेंबर २०२१ मध्ये इंधनाच्या किमतीतील शेवटची सुधारणा करण्यात आली होती.

हे ही वाचा..

उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू

ठाण्यातून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेविका मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील!

सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू

‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

यावरून भाजपने कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. काँग्रेस म्हणते की देशात महागाई आहे आणि मग त्यांची राज्य सरकारे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू लागतात. कर्नाटकात त्यांनी शेतकरी विरोधी आणि सामान्य माणूस विरोधी आदेश, फतवा, जिझिया कर पारित केला आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ३ रुपये आणि ३.०५ रुपयांची वाढ केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा