25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनिया‘तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवा’

‘तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपविण्याचे आवाहन करत सर्वसमावेशक समाजाचा पाया रचण्यासाठी तंत्रज्ञान सर्जनशील केले पाहिजे, अशी गरज व्यक्त केली.इटलीच्या अपुलिया प्रदेशातील जी७ शिखर परिषदेच्या सत्रात संबोधित करताना ते बोलत होते. ‘जगभरातील दक्षिणेकडचे देश अनिश्चितता आणि तणावाचा फटका सहन करत आहेत. या दक्षिणेकडील देशांचे प्राधान्यक्रम आणि चिंता जागतिक मंचावर मांडणे ही भारताने आपली जबाबदारी मानली आहे,’ असेही मोदी यावेळी म्हणाले.

‘या प्रयत्नांमध्ये आम्ही आफ्रिकेला उच्च प्राधान्य दिले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० ने आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्य बनवल्याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे ते म्हणाले.आफ्रिकेतील सर्व देशांचा आर्थिक आणि सामाजिक विकास, स्थैर्य आणि सुरक्षितता यासाठी भारत योगदान देत आहे आणि भविष्यातही ते करत राहील,’ अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर विशेष भर देऊन तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी विस्तृतपणे भाष्य केले.
‘आपण तंत्रज्ञानाला सर्जनशील बनवले पाहिजे, विनाशकारी नाही. तरच आपण सर्वसमावेशक समाजाचा पाया रचू शकू. या मानव-केंद्रित दृष्टिकोनातून भारत चांगल्या भविष्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे मोदी म्हणाले.कृत्रिम बुद्धिमत्तेवर राष्ट्रीय रणनीती तयार करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचा अभिमान पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
“या रणनीतीवर आधारित, आम्ही यावर्षी एआय मिशन सुरू केले आहे. त्याचा मूळ मंत्र ‘एआय फॉर ऑल’ आहे.

हे ही वाचा..

प. बंगालमधील निवडणुकीनंतरचा हिंसाचार म्हणजे मृत्यूचे तांडव!

सुरत महानगरपालिकेच्या १३ मंदिरांना पाडण्याच्या नोटीसनंतर विहिंपकडून निदर्शनांचा इशारा!

‘ममता दीदी, आम्हाला विष द्या म्हणजे आम्ही शांतपणे मरू शकू’

विवान कारुळकरच्या पुस्तकाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली दखल

एआयसाठी जागतिक भागीदारीचे संस्थापक सदस्य आणि प्रमुख अध्यक्ष म्हणून आम्ही सर्व देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन देत आहोत,’ असे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या जी-२० शिखर परिषदेत नवी दिल्लीने एआयच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.‘भविष्यातही, आम्ही ‘एआय’ पारदर्शक, निष्पक्ष, सुरक्षित, प्रवेशयोग्य आणि जबाबदार बनवण्यासाठी सर्व देशांसोबत एकत्र काम करत राहू,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जा क्षेत्रात भारताचा दृष्टिकोन चार तत्त्वांवर आधारित आहे – उपलब्धता, सुलभता, परवडणायोगे आणि स्वीकारार्हता.
सन २०७०पर्यंत ‘नेट झिरो’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. येणारा काळ हरित युगाचा बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘लोकांचा आशीर्वाद हाच लोकशाहीचा विजय’
‘भारतातील निवडणुका हे लोकशाहीचे मोठे पर्व आहे. जनतेने तिसऱ्यांदा मला सेवा करण्याची संधी दिली आहे. सहा दशकात पहिल्यांदा कोणा व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच, विकसित भारतनिर्माण हाच आमचा संकल्प आहे, यावरही त्यांनी जोर दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा