26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअमोल किर्तीकारांची मागणी फेटाळत मतमोजणीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार

अमोल किर्तीकारांची मागणी फेटाळत मतमोजणीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार

मतमोजणी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळावेत अशी मागणी किर्तीकारांनी नोडल अधिकाऱ्याकडे केली होती

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये चुरशीची लढत रंगली होती. अखेर निकाल लागला आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ४६ मतांनी पराभूत व्हावे लागले. याप्रकरणी अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. तसेच मतमोजणी वेळीचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागाणी त्यांनी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी यास नकार दिला असून यामुळे अमोर्ल किर्तीकर यांना धक्का बसला आहे.

ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवले आणि मतमोजणी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी मागणी अमोल कीर्तिकर यांनी नोडल अधिकाऱ्याकडे केली होती. पण, अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्यात बसत नसल्याची माहिती कीर्तिकरांना दिली आहे, अशी माहिती समोर अली आहे.

मतमोजणीच्या दिवशी रवींद्र वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत होते असा आरोप आहे. याप्रकरणी हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी निवडणूक आयोगाकडे आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, उमेदवाराच्या तक्रारीची दखल न घेता, तहसीलदारांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार केलं असल्याची माहिती आहे. आरोपीचे नाव मंगेश पंडीलकर असं असून तो वायकर यांचा मेहुणा असल्याचं सांगण्यात येतं आहे.

हे ही वाचा..

पाकिस्तानच्या राष्ट्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये अल्पसंख्याकांसाठी शून्य तरतूद

लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत खटला चालवण्यास मंजुरी

सामन्यानंतर अमेरिकेचा क्रिकेटपटू हॉटेलमधून करतो वर्क फ्रॉम होम

अमेरिकेची टी २० विश्वचषकाच्या सुपर आठमध्ये धडक; पाकिस्तान आऊट

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत झाली. यात वायकर यांनी कीर्तिकर यांचा अवघ्या ४६ मतांनी पराभव केला. फेरमतमोजणीमध्ये रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या मतमोजणीवेळी अमोल कीर्तिकर यांना २ हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आलं, पण वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली होती. यात त्यांचा विजय झाला. अमोल कीर्तिकर यांनी याप्रकरणी गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा