27 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेषप्रसाद शुद्धी चळवळीला त्र्यंबकेश्वरमधून प्रारंभ!

प्रसाद शुद्धी चळवळीला त्र्यंबकेश्वरमधून प्रारंभ!

विक्रेत्यांना 'ओम प्रमाणपत्राचे' वितरण

Google News Follow

Related

मंदिरात शुद्ध आणि सात्विक प्रसाद वितरित व्हावा, तसेच भेसळयुक्त प्रसाद वितरणाला आळा बसावा, यासाठी ओम प्रतिष्ठानच्या वतीने प्रसाद शुद्धी चळवळीचा शुभारंभ करण्यात आला. शुक्रवार, १४ जून रोजी नाशिक येथे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि महंत आचार्य पीठाधिश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या नेतृत्वात या प्रसाद शुद्धी चळवळीच्या माध्यमातून ‘ओम प्रमाणपत्र’ (OM Certification) मंदिराच्या परिसरातील निवडक प्रसाद विक्रेत्यांना देण्यात आले.

या प्रसाद शुद्धी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे प्रतिनिधी, संत, महंत, आखाडा प्रमुख, पुरोहित संघाचे अध्यक्ष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम ‘ओम प्रमाणपत्रा’ची (OM Certification) त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजन करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात सामूहिक आरती करण्यात आली. मंदिरात श्री त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात या प्रमाणपत्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जोर जोरात घोषणा दिल्या. याप्रसंगी मंदिराच्या परिसरातील काही निवडक प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ (OM Certification)  वितरीत करण्यात आले.

त्र्यंबकनगरीत हिंदुत्वाचा हुंकार!

या प्रसाद शुद्धी चळवळीची सुरुवात नाशिक झाली आहे, पुढे ती राज्य आणि देश पातळीवर विस्तारली जाणार आहे, असे  ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले. यावेळी नाशिक परिसरातील समस्त संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, महाराष्ट्र मंदिर महासंघ, समन्वयक सुनील घनवट, महंत गिरिजानंद महाराज, महंत शंकरानंद महाराज, महंत संतोकदास महाराज, महंत रामरामेश्वर महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत राहुलेश्वर महाराज, महंत प्रेमपुरी महाराज, पंडित सतीश शुक्ल, पंडित भालचंद्र शौचे, पंडित तपनशास्त्री शुक्ल, पंडित पुरूषोत्तम लोहगांवकर, पंडित रूद्र लोहगांवकर, पंडित मयुरेश दीक्षित, पंडित सत्यप्रिय शुक्ल, पंडित कळमकर गुरूजी, पंडित मनोज थेटे, पंडित नागेशशास्त्री देशपांडे, पंडित दिपेशशास्त्री देशपांडे, पंडित राहुलशास्त्री देशपांडे, डाॅ.व्यंकटेश जोशी, पंडित संकेत टोके, रामसिंग बावरी, गजुभाऊ घोडके, एड. प्रविण साळवे, प्रशांत गडाख, विष्णुभाऊ, श्रीमती पांडे भाभी, अतुल सुपेकर, ह.भ.प. उगलमोगले महाराज, एड. भानुदास शौचे, बंडोपंत अहिरराव, अक्षय अहिरराव, पवार सर, हर्षवर्धन बोऱ्हाडे सर, नंदकिशोर भावसार, स्वप्निल माशाळकर, नीरज कुलकर्णी, राजेंद्र नाचणे, मैथिली नाचणे, अनिरुद्ध कंठे, अपर्णा कंठे, नितीन जोशी, गणेश ठोंबरे, हिंदू जनजागृती समिती, मुंबई  समनव्यक सागर चोपदार,हिंदु जनजागृती समिती, नाशिक समन्वयक, कु. राजेश्री देशपांडे, सकल हिंदू समाज नाशिक, मुख्य समन्वयक कैलास पंडित देशमुख, हिंदवी स्वराज्य  प्रतिष्ठान, नाशिक संस्थापक अध्यक्ष, सागर देशमुख, मेजर किसन गांगुर्डे, विश्व हिंदू सेना, संस्थापक अध्यक्ष नाशिक अधिवक्ता महेंद्र शिंदे, गोराराम मंदिर, नाशिक विश्वस्त दिनेश मोठे, विघ्नहर गणेश मंदिर,नाशिक विश्वस्त रवींद्र पाटील आदींचा सहभाग होता.

काय आहे ‘ओम प्रमाणपत्र’?

प्रसाद शुद्धी चळवळीअंतर्गत’ओम प्रमाणपत्र’ (OM Certification) बनवण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात क्यु आर कोड देण्यात आला आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर संबंधित मिठाई विक्रेत्याचा सर्व तपशील समोर येतो. त्यामुळे या प्रमाणपत्राचा कुणी दुरुपयोग करू शकणार नाही.आपण प्रसाद कुणाकडून खरेदी करत आहोत याची माहिती या प्रमाण पत्रावरून सहज आपल्याला मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा