रा.स्व.संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे काल नागपूरमध्ये तृतीय वर्ष, संघशिक्षा वर्गाच्या समारोप सत्रात बौद्धिक झाले. त्यावर माध्यामामध्ये जोरदार हंगामा झाला.. सरसंघचालकांनी भाजपाला झापले, त्यांचे कान उपटले, अशा बातम्यांचे पिक आले आहे. संघाने भाजपाला सत्तेवरून खाली खेचावे असे विनोदी सल्ले उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत देतायत. उद्धव ठाकरे यांनीही अशीच मनोरंजक टीप्पणी केलेली आहे. संघाचे बौद्धिक पचायला जड आणि समजायला अवघड असते हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झालेले आहे.