लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्या यशानंतर आता महाविकास आघाडीला वेध लागले ते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जिंकण्याचे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य शेतकरी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला राज्य ताब्यात घ्यायचा आहे. दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तिथं जाहीर सभा आयोजित केलेली होती आणि या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक कशा पद्धतीने झाली हे आपण बघितलेलंच आहे. म्हणजे ज्या पवारांना राज्य ताब्यात घ्यायचा आहे त्या पवारांनी आधी आपल्या पक्षात सुरू असलेली जी धुसफूस आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.