24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषघुसखोर बांगलादेशींना हुडकून हाकलून लावा

घुसखोर बांगलादेशींना हुडकून हाकलून लावा

विहिंपचे प्रांतमंत्री मोहन सालेकर यांची मागणी

Google News Follow

Related

मुंबईत दहशदवाद विरोधी पथकाने चार बांगलादेशी नागरिकांना पकडल्याच्या बातमीने राज्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या जबाबात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केल्याचे सांगितले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी करून देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा घुसखोरांना तातडीने देशातून हाकलून लावावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री मोहन सालेकर यांनी केली आहे.

सालेकर म्हणाले, आज अनेक राज्यात अशा घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदानाचा हक्क मिळवला. तथाकथित सेक्युलरवाद्यांनी त्यांना संरक्षण देऊन आपली मतपेढी तयार केली आहे. पश्चिम बंगाल सारख्या राज्यात हिंदू आया बहिणींच्या अब्रूचे धिंदवडे निघत असताना केवळ अशा जिहादी घुसखोरांना एकगठ्ठा मतांमुळे ममता बनर्जी पुन्हा पुन्हा विजयी होताना दिसत आहेत.

हे ही वाचा..

पावसाच्या हजेरीमुळे मुंबईत वाहतूक कोंडी!

पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर योग दिन साजरा करणार?

कुवेतमधील ४५ भारतीयांचे मृतदेह भारतात पोहोचले, अग्निकांडात गमावला होता जीव!

जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग!

मुंबईतील अलीकडच्या घटनेने सतर्क होऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अशा घुसखोरांमुळे राज्यातील अनेक शहरे आज ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहेत. महायुतीच्या सरकारने या प्रश्नाकडे धार्मिक दृष्ट्या न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न समजून सर्व संशयित वस्त्यांचे सर्वेक्षण हाती घ्यावे, अशा घुसखोरांना हुडकून त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही सालेकर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा