29 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांच्‍या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार

जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळांच्‍या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार

शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना निर्देश

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्‍या कामकाजाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या शासनाच्या प्रधान सचिवांनी एका परिपत्रकाद्वारे केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांना असे निर्देश दिले आहेत.

जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण विभागाने बुधवार, १३ जून रोजी जारी केलेल्‍या परिपत्रकात म्हटले आहे की, “असे आढळून आले आहे की, जम्‍मू-काश्‍मीरमधील शाळांमध्‍ये एकसमान नियम नाहीत. काही शाळा पारंपरिक नियमांचे पालन करत नाहीत. सर्व शाळांच्‍या कामकाजाची सुरुवात ही राष्ट्रगीताने व्‍हावी. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची आणि शिस्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा एक अमूल्य असा उपक्रम आहे.” शाळांमध्‍ये सकाळच्‍या सत्रात राष्‍ट्रगीताबरोबरच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि अंमली पदार्थांच्या विरोधात जगजागृती करण्‍यात यावी, असेही शालेय शिक्षण विभागाने म्‍हटलं आहे.

शाळांना असेही निर्देश देण्यात आले आहेत की, सकाळची सामुहिक प्रार्थना (असेंब्ली) २० मिनिटे चालेल. यासाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेच्या दिवशी सुरुवातीला नियुक्त केलेल्या ठिकाणी एकत्र येणे आवश्यक आहे. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी महान व्यक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्मचरित्रांवर चर्चा करावी. तसेच शालेय कार्यक्रम आणि उपक्रमांबाबत दैनंदिन माहिती द्यावी. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी भाषणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा..

इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भारताची छाप; ‘नमस्ते’ने सर्वांचे स्वागत

“नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जिंकल्यासारखं वाटलं”

भारताप्रमाणे, पाकिस्तान मुक्त, निष्पक्ष निवडणुका का घेऊ शकत नाही?

तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद

परिपत्रकानुसार, मानसिक सामर्थ्य आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तणाव व्यवस्थापन आणि आरोग्य बाबतीतील माहिती, सांस्कृतिक उत्सवांसह आणि विविध संस्कृती आणि ऐतिहासिक घटनांबद्दलची माहिती हे सकाळच्या संमेलनात समाविष्ट केले जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा