देशात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्र्यांनाही खाती देण्यात आली आहेत. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून पी. के. मिश्रा यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
अजित डोवाल यांची २० मे २०१४ रोजी पहिल्यांदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डोवाल हे या पदावर कार्यरत आहेत. अजित डोवाल यांच्या अगोदर शिवशंकर मेनन यांच्याकडे ही जबाबदारी होती. १९६८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवाल यांना दहशतवादविरोधी तज्ञ मानले जाते. दहशतवाद्यांविरोधात भारताकडून चालविण्यात आलेल्या मोहिमांमध्ये अजित डोवाल यांचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा..
‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!
सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?
दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्या: पंतप्रधानांच्या सूचना
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारसोबत चर्चेला तयार!
दुसरीकडे पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पी. के. मिश्रा यांच्याकडेच पुन्हा एकदा प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेट नियुक्ती समितीने अजित डोवाल आणि पी. के. मिश्रा यांना आपल्या पदावर पुनर्नियुक्त केले आहे. पी. के. मिश्रा हे सुद्धा १९७२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मिश्रा हे मागील १० वर्षांपासून पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. ते प्रशासकीय कामकाज आणि पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नियुक्त्या पाहण्याचे काम करतील. अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी घडामोडी आणि गुप्तचर विभागाची जबाबदारी सांभाळतील.