नागपूर जिल्ह्यातील धामनाजवळील एका स्फोटकं बवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. चामुंडा कंपनीत झालेल्या या स्फोटात पाच कामगारांचा ,रुत्यू झाला आहे तर दहा कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मृत कामगारांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. दुपारी हा स्फोट झाला आहे.
नागपूर जवळील धामना येथे स्फोटकं तयार करणारी चामुंडा कंपनी असून रोजप्रमाणे सकाळी दहा वाजता युआ कंपनीचे काम सुरू झाले. यानंतर १२.३० च्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाला. यात पाच कामगारांचा कंपनीत मृत्यू झाला तर दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दगावलेले कामगार वाडी आणि धामना परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.
घटनासथळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून जखमी झालेल्यांमध्ये तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. दरम्यान, या घटनेच्या चौकशीची मागणी केली जात आहे. जवळपास दोन तासानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अजूनही कुठला अनर्थ होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळावर आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.
हे ही वाचा:
अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार, पेमा खांडूं बनले मुख्यमंत्री!
डोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश
धक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!
रियासीतील हिंदू हत्याकांडाच्या निषेधार्थ अंधेरीत निदर्शने!
काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील बाजारगावातील एका सोलर एक्सप्लोरी कंपनीत स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर, तीन जणांना वाचवण्यात यश आले होते. ही कंपनी संरक्षण क्षेत्राला लागणारा दारुगोळा निर्मितीचे काम करत होती. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लॅन्टमध्ये पॅकिंगचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारूगोळा निर्मितीचे काम सुरु होते. त्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. या केमिकलमुळे हा स्फोट झाला होता आणि त्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता.