लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार आहेत.त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत दाखल होऊन उमेदवारी अर्ज भरला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर एनडीएने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले.दरम्यान, निवडणुकीनंतर राज्यसभेतील १० खासदार लोकसभेवर गेल्याने या जागा रिक्त आहेत.यातील एक रिक्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांची आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? याची चर्चा सुरु होती.आता या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत.अखेर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
हे ही वाचा:
डोंबिवली एमआयडीसीमधील ४२ केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश
धक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!
रियासीतील हिंदू हत्याकांडाच्या निषेधार्थ अंधेरीत निदर्शने!
अल्लाह तआला देख लेगा… ‘न्यूज डंका’च्या बातमीसह ‘हा’ मेसेज व्हायरल
दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची बातमी समोर आलो होती.परंतु, त्यांच्या सहमतीनेच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.स्वतः याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या नावावरून आमच्यात काहीच वाद नाहीत, मी स्वतः देखील नाराज नाही.आमच्या सर्वांच्या सहमताने त्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.