भाजपचे ज्येष्ठ आदिवासी नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले मोहन चरण माझी यांनी बुधवारी (१२ जून) ओडिशाच्या मुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे.तर केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक हे उपस्थित होते.विशेष म्हणजे मोहन माझी हे राज्यातील पहिले भाजपचे मुख्यमंत्री आहेत.
भुवनेश्वरच्या जनता मैदानावर संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.ओडिशाचे उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते केव्ही सिंग देव आणि प्रवती परिदा यांनीही शपथ घेतली.या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, जुआल ओरम आणि अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेते उपस्थित होते.
हे ही वाचा:
टँकर माफियांवर कारवाई करता येत नसल्यास पोलिसांना सांगतो; सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला खडसावले
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, ४० भारतीयांचा मृत्यू !
रशिया- युक्रेन युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू
पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या गुंड जयेश पुजाऱ्याला कोर्टात चोपलं!
दरम्यान, ओडिशाच्या मुखमंत्री पदासाठी मोहन चरण माझी यांच्या नावाची घोषणा कालच (११ जून) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती.तसेच उपमुख्यमंत्र्यांच्याही नावाची घोषणा कालच करण्यात आली होती.५३ वर्षीय मोहन माझी हे आदिवासी समाजातील आहेत.ते राज्यातील पहिल्या भाजप सरकारचे नेतृत्व करणार आहेत. केओंधार विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.विशेष म्हणजे २४ वर्ष ओडिशावर राज्य करणाऱ्या नवीन पटनायक यांचा विधानसभेत पराभव करत भाजपने बाजी मारली आणि पहिल्यांदा राज्यात भाजपने सरकार स्थापन केले.