कुख्यात आरोपी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा जेलमधून धमकी देणारा गुंड जयेश पुजाऱ्याला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली आहे.आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुंड जयेश पुजारीला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले असता हा प्रकार घडला.सुनावणीदरम्यान जयेश पुजाऱ्याने कोर्टात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लगावल्यानंतर संतप्त नागरिकांनी जयेश पुजाऱ्याची चांगलीच धुलाई केली.
आयपीएस अधिकारी धमकी प्रकरणाची सुनावणी आज बेळगाव कोर्टात पार पडणार होती.गुंड पुजाऱ्याला पोलसांनी कोर्टात हजर केले असता ‘कोर्ट आणि पोलीस माझं म्हणणं ऐकत नाही’ असे सांगत जयेशने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने कोर्टाच्या परिसरातील नागरिक संतापले होते.पोलिसांनी जयेशला कोर्टातून बाहेर काढताच संतप्त नागरिकांनी जयेशवर हल्ला चढवत चांगलाच चोप दिला.
हे ही वाचा:
चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्रच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, मोदींनी मारली मिठी!
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत होणार ‘एनएसजी हब’!
आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं
वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या निर्णयाला विहिंपचा विरोध
दरम्यान, जयेश पुजारी सध्या अटकेत असून हिंडलगा जेलमध्ये बंद आहे.गुंड जयेशने याच जेलमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जिवेमारण्याची धमकी दिली होती.