डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे.एमआयडीसीच्या फेज-२ मधील एका कंपनीला आग लागली आहे.स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील आगीची ही दुसरी घटना आहे.काही दिवसांपूर्वी एका कारखान्यात स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली होती.त्या दुर्घटनेत अनेक लोकांचा निष्पाप बळी गेला होता.आता पुन्हा एकदा एमआयडीसीच्या फेज-२ मधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मालदे आणि इंडो अमाईन्स कंपनीला आग लागली आहे.अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.एमआयडीसीमधून स्फोटाचे आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; जुलैमध्ये सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प
अठराव्या लोकसभेचे विशेष अधिवेशन २४ जूनपासून
जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध
जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार
दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील आगीची महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे.२३ मे रोजी अमुदान कंपनीमध्ये अशीच आग लागली होती.त्या दुर्घटनेत १० हुन अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.त्यानंतर कंपनीच्या मालकास अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.