दक्षिणपूर्व आफ्रिकेमधील मलावी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.या अपघातात त्यांच्यासह विमानातील अन्य नऊ जणही दगावले आहेत.विमानाच्या अपघाताची माहिती मलावीच्या अध्यक्षांकडून देण्यात आली आहे.
उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा आणि इतर नऊ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. ‘विमान रडारवरून बेपत्ता झाल्यानंतर विमान अधिकाऱ्यांनी वारंवार विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नव्हते.दरम्यान, या विमानाचा अपघात झाला असून या अपघातात उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा आणि इतर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
“गेल्या ६० वर्षांत जे निर्णय घेतले गेले नाहीत ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत घेतले”
निवडणुकीत ठाकरेंनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीला!
लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!
बुधवारी चंद्राबाबू नायडू घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
मलावीच्या अध्यक्षीय कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५१ वर्षीय चिलिमा मलावी सुरक्षा दलाच्या विमानातून प्रवास करत होते.हे विमान स्थानिक वेळेनुसार, सकाळी नऊ वाजून १७ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी) राजधानी लिलोंग्वे येथून रवाना झाले होते. हे विमान उत्तर भागातील म्जुजु येथे उतरणे अपेक्षित होते. मात्र, मध्येच विमानाचा संपर्क तुटला आणि विमान गायब झाले.विमान गायब झाल्यापासून शोधमोहीम सुरू करण्यात आली.शोध मोहिमेनंतर विमानाला भीषण अपघात झाल्याचे आढळून आले. या अपघातात उपराष्ट्रपती चिलिमा आणि विमानातील इतर नऊ जणांचाही मृत्यू झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.