26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणचिराग पासवान यांचा उदय: अयशस्वी अभिनेता ते मोदी ३ कॅबिनेटमध्ये मंत्री

चिराग पासवान यांचा उदय: अयशस्वी अभिनेता ते मोदी ३ कॅबिनेटमध्ये मंत्री

Google News Follow

Related

बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख चिराग पासवान यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले, चिराग पासवान यांनी ६.१४ लाख मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि त्यांच्या सर्वात जवळच्या राजदच्या प्रतिस्पर्ध्याचा १.७ लाख मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीने त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून अधोरेखित केले आहे. त्यामुळे बिहारमध्ये आणि राष्ट्रीय मंचावर एक प्रमुख नेता म्हणून उदयास येण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

चिराग पासवान यांचा हाजीपूरमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय अत्यंत प्रतिकात्मक होता. याच मतदारसंघाचे त्यांचे दिवंगत वडील आणि बिहारचे सर्वोच्च दलित नेते रामविलास पासवान यांनी आठ वेळा प्रतिनिधित्व केले होते. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) बिहारमध्ये लढवलेल्या पाचही लोकसभा जागा जिंकून शानदार कामगिरी केली. चिराग आणि त्याचे काका पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील लोजपला दोन गटांमध्ये विभाजित करणाऱ्या वादानंतर हा विजय प्राप्त झाला.

एक दशकापूर्वी चिराग पासवान यांनी राजकारणात पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी बॉलीवूडमध्ये थोड्या काळासाठी का होईना नशीब आजमावले होते. सन २०११मध्ये त्यांनी अभिनेत्री-खासदार कंगना राणावतसोबत ‘मिली ना मिली हम’ चित्रपटात भूमिका केली होती. त्यानंतर वडील रामविलास पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली, चिराग यांनी २०१४मध्ये जमुई येथून लोकसभेत पदार्पण केले आणि २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा राखली.

सन २०२०मध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर, चिराग आणि त्यांचे काका पशुपती पारस यांच्यात कौटुंबिक आणि राजकीय मतभेद निर्माण झाले. या आव्हानांना न जुमानता, सन २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी आपल्या पक्षाचे नेतृत्व केले आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. जनता दल (संयुक्त) पक्षाच्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याच्या त्यांच्या रणनीतीचा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कामगिरीवर लक्षणीय परिणाम झाला. सन २०१५मधील त्यांच्या जागांची संख्या ७०वरून २०२०मध्ये ४३पर्यंत घसरली. या धाडसी पावलाने बिहारमध्ये चिराग यांना दलित नेता म्हणून प्रस्थापित केले.

लोजपमध्ये दुही

सन २०२१मध्ये चिराग आणि त्यांचे काका यांच्यातील तीव्र कलहामुळे लोजपचे विभाजन झाले. पारस यांनी सहापैकी पाच लोजपच्या खासदारांना सोबत घेतले आणि त्यांच्या पुतण्याच्या गटाकडे केवळ एकच खासदारपद शिल्लक राहिले. तर, एकही आमदार चिराग यांच्याकडे नव्हता. भाजपने सुरुवातीला पारस यांची बाजू घेत त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्त केले. चिराग केवळ एनडीएतूनच बाहेर पडले नाही, तर पक्षाचे चिन्हही त्याच्या काकांच्या गटात गेले. मात्र, चिराग यांची नरेंद्र मोदींवरील निष्ठा कायम होती. त्यांनी ‘आशीर्वाद यात्रे’च्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक प्रचार मोहिमेला सुरुवात केली, ज्याला संपूर्ण बिहारमध्ये मोठा पाठिंबा मिळाला.

हे ही वाचा:

मुरलीअण्णांना लॉटरी !

गडकरींची मंत्रीपदाची हॅट्रिक!

बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !

गोयल यांची पुन्हा वर्णी !

चिराग यांचा वाढता प्रभाव ओळखून भाजपने सन २०२३मध्ये त्याचे पुन्हा एनडीएमध्ये स्वागत केले. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेत, चिरागच्या गटाने पारस यांना बाजूला करत हाजीपूरसह बिहारच्या पाचही लोकसभा जागा जिंकल्या. चिरागने आपली जमुईची जागा सोडली आणि हाजीपूरमधून प्रतिष्ठेची लढाई लढवली आणि जिंकली.
या विजयाने वडिलांच्या राजकीय वारशाचा खरा वारसदार म्हणून चिरागचा दावा पक्का झाला. मोदी ३ मंत्रिमंडळात चिराग यांचा समावेश झाल्याने ते आता राष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवत बिहारच्या पलीकडे आपला प्रभाव वाढवण्यास सज्ज झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा