पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. बूथ प्रमुख, नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. त्यंच्या रूपाने पुण्याला तब्बल ३० वर्षांनी मंत्रीपद मिळाले आहे.
पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे.
हे ही वाचा:
बुलढाण्याला जिल्ह्याला २२ वर्षांनी मंत्रीपद !
मै नरेंद्र दामोदरदास मोदी… मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी २००२ , २००७ , २०१२ आणि २०१७ झाले आहेत.मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात.