बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. १९९७ नंतर तब्बल २२ वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळाले आहे.शिवसेनेतील फुटीनंतर प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली.
हे ही वाचा:
मै नरेंद्र दामोदरदास मोदी… मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
आमच्या मनात वेगळं काही नाही, आम्ही एनडीएसोबतच!
ओडिशातील पराभवानंतर व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा!
प्रतापराव जाधव हे १९९० पासून राजकारणात सक्रीय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिला आहे. त्यांनी या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा पराभव केला.