24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणमै नरेंद्र दामोदरदास मोदी... मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

Google News Follow

Related

भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वात त्यांनी केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची एनडीएमधील घटक पक्षांनी एकमताने नियुक्ती केली होती. राष्ट्रपती भवनात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला आहे.

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी त्यांचे नाव उच्चारताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. यावेळी उपस्थितांनी मोदी, मोदी असा जयघोष केला. नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी सोहळ्यासाठी भारताच्या शेजारच्या अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. याचबरोबर देशभरातील कला, क्रीडा, उद्योग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थीती होती. यावेळी नरेंद्र मोदी यांना कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधान पद आणि गोपनीयतेची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. राष्ट्रपती भवन संकुलात आयोजित या सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार विशेष पाहुणे उपस्थित होते.

हे ही वाचा:

आमच्या मनात वेगळं काही नाही, आम्ही एनडीएसोबतच!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित

जम्मूच्या ज्वेलर्सने नरेंद्र मोदींसाठी बनवले चांदीचे कमळ!

काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरत आहेत. यापूर्वी २०१४, २०१९ साली पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

१८ व्या लोकसभेचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला असून यात एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणारे असणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा