26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाहमासच्या कैदेत असलेल्या चार इस्रायली नागरिकांची सुटका

हमासच्या कैदेत असलेल्या चार इस्रायली नागरिकांची सुटका

इस्रायली सैन्याची विशेष मोहिमेदरम्यान कारवाई

Google News Follow

Related

हमासच्या कैदेत असलेल्या चार इस्रायली नागरिकांची शनिवार, ८ जून रोजी मध्यवर्ती गाझा पट्टीतून एका विशेष मोहिमेनंतर इस्रायल संरक्षण दलाने सुटका केली आहे, अशी माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. नोआ अर्गामनी (वय २५ वर्षे), अल्मोग मीर जान (वय २१ वर्षे), आंद्रे कोझलोव्ह (वय २७ वर्षे) आणि श्लोमी झिव्ह (वय ४० वर्षे) अशी सुटका करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी युआ चौघांचे सुपरनोव्हा संगीत महोत्सवातून हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने यासंबंधीचे वृत्त देत अहवाल दिला आहे.

माहितीनुसार, चारही ओलिसांची प्रकृती चांगली असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ‘शेबा’ टेल-हाशोमर मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. या चौघांनाही IDF, ISA आणि इस्रायल पोलिसांनी नुसीरतच्या मध्यभागी असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून विशेष मोहिमेदरम्यान वाचवले. दरम्यान, इस्रायली सैन्याने इतर ओलिसांना घरी आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे. अहवालानुसार, मध्य गाझाच्या नुसीरतमध्ये एकाच वेळी दोन हमासच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर विशेष दलांनी ओलीसांची सुटका केली.

हे ही वाचा:

“देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नसून लढणारा व्यक्ती”

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव जाणार शपथविधीला

८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’

शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले

अर्गामनी या २५ वर्षीय चिनी वंशाच्या इस्रायली नागरिकाचेही या संगीत महोत्सवातून अपहरण करण्यात आले होते. सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यात तिला मोटारसायकलवरून घेऊन जात असताना ती ओरडत होती. ताज्या फुटेजमध्ये अर्गमनी तिच्या वडिलांसोबत पुन्हा एकत्र आल्याचे दाखवले आहे. तिने हसत हसत त्यांना गाडीत बसवून मिठी मारली आहे. शनिवारी बचावकार्य सुरू झाल्याच्या बातम्यांनंतर काही वेळातच हे दृश्य प्रसारित करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा