मुंबईत भाजपाची बैठक पार पडली असून या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केले. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वास देत विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले.
“लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात कमी पडलो. जबाबदारीतून मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात योजना होती. अमित शाह यांना भेटून आलो, त्यांनाही योजना सांगितली. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव जाणार शपथविधीला
८० पैकी ६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात ‘धन्यवाद यात्रा’
शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले
पुणे अपघातातील आपल्वायीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर
लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर आणि एनडीएवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला याचा जसा आनंद आहे, तशीच मनात सल आहे. २०१४ आणि २०१९ जो सिंहाचा वाटा उचलला होता तो आता आपण उचलला नाही. आता आपल्याला पुन्हा एकदा रणनीती ठरवता यावी यासाठी ही बैठक आहे. पराभवाची कारणे शोधून ती कशी दूर करता येईल यासाठी निर्धार केला आहे. उन्हाळा संपत असून काहीली पण संपत आहे. पावसाळा जवळ आलाय. पाऊस पडताना जे पेरलं जातं ते उगवत म्हणून आपण नव्याने पेरण्याची वेळ आलेली आहे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.