26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामापुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर

सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई

Google News Follow

Related

पुणे अपघात प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. पुण्यामधील कल्याणीनगर येथे दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांचा महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आला होता. आता आणखी या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालविण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

सुरेंद्र अगरवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सुद्धा सील केला होता. अग्रवाल कुटुंबीयांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवावा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. यानंतर कारवाईला वेग आला होता.

कारवाई दरम्यान, आपल्वायीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमारच्या नावे असलेल्या महाबळेश्वरमधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर धाड टाकत ही कारवाई केली होती. या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला होता. त्यानंतर बार सील करण्यात आला होता.

हे ही वाचा:

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित

‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!

एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा सुरेंद्र अग्रवालने नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सध्या अल्पवयीन आरोपीचे आई वडीलही विविध गुन्ह्यांच्या अंतर्गत कोठडीत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा