नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी (७ जून) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली.यावेळी सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली.मोदींनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जनतेला दिलेल्या आश्वासनाचाही उल्लेख केला, ज्यात काँग्रेस पक्षाने ४ जूननंतर जनतेला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.यावरून मोदींच्या काँग्रेसवर जोरदार टीका केली.
माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे लोक किती खोटं बोलत आहेत.निवडणुकीच्या वेळी या लोकांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी स्लिप वाटून, ‘हे देऊ, ते देऊ’ अशी घोषणा केली.दोन दिवसांपासून मी बघत आहे की, काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लोक रांग लावून उभे आहेत, ही घ्या स्लिप, ‘एक लाख रुपये कुठे आहेत, आणा द्या’, असे विचारताना दिसत आहेत.ते पुढे म्हणाले, तुम्ही जनता जनार्दनच्या डोळ्यात कसली धूळफेक केली, ४ जूननंतर १ लाख रुपये मिळतील असे त्या गरीब सामान्य माणसाला वाटले होते, म्हणून तो रांगेत उभा होता, आता त्याला धक्के मारले जात आहेत, त्यांच्यावर लाठीमार केला जात आहे, हाकलून दिले जात आहे, असे मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
पावसाळा पूर्व कामे तातडीने पूर्ण करा
‘तीन निवडणुकांत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या आम्हाला एकाच निवडणुकीत मिळाल्या!’
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!
दरम्यान, निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रत्येक गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरवर्षी १ लाख रुपये देण्याचे आश्वासन देत अनेक घरांना ‘गॅरंटी कार्ड’ वितरित केले होते. यानंतर कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. विशेषत: मुस्लिम महिला लखनऊमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उभ्या होत्या. पोस्ट ऑफिस आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या महिला सांगतात की, ते खाते उघडण्यासाठी फॉर्म घेण्यासाठी आले आहेत, जेणेकरून काँग्रेसच्या आश्वासनानुसार दरमहा ८००० रुपये त्यांच्या खात्यात येऊ लागतील.