टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताला पराभूत करून अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सौरभ नेत्रावलकरचे सगळीकडे कौतुक होत आहे. ओरॅकल कंपनीचा तंत्र्ज्ञ असणारा सौरभ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.हा क्रिकेटपटू कोडशी संबंधित तंत्रज्ञानात पारंगत आहे. ओरॅकल कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ‘एक्स’वर जेव्हा जाहीर केले की, त्याचा एक सहकारी सौरभ नेत्रावलकर रोहित शर्माच्या भारतीय संघाविरुद्ध टी२० सामन्यात लढणार आहे, तेव्हा सौरभचे नाव चर्चेत आले होते.
के. एल. राहुलचा माजी संघसहकारी
१६ ऑक्टोबर, १९९१ रोजी जन्मलेला नेत्रावलकर याने आधी अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्वही केले आहे. मात्र त्याने भारतातही लोकल सामने खेळले आहेत. १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग असलेला सौरभ सन २०१५मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाला. त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीही खेळली आहे. गंमत म्हणजे तो केएल राहुल, मयांक अग्रवाल, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि संदीप शर्मा यांचा संघसहकारीही राहिला आहे.
हे ही वाचा:
टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!
सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार
कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे-भाजपा आमने-सामने नाहीत; मनसेने घेतली माघार
पाकिस्तानशी पहिला सामना सन २०१०मध्ये
टी २० विश्वचषक स्पर्धेत अमेरिका आणि पाकिस्तानचा पहिल्यांदाच सामना झाला असला तरी नेत्रावलकरने मात्र पाकिस्तानचा पाकिस्तानशी सन २०१०मध्येच पहिल्यांदा सामना केला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत राहुलच्या नेतृत्वाखालील या क्रिकेटपटूने आपल्या गोलंदाजीने पाकिस्ताना नामोहरम केले होते. नेत्रावलकने अहमद शेजझाद याची विकेट घेतली होती. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर दोन विकेटने मात केली होती. याच विश्वचषक स्पर्धेत नेत्रालवकर हा सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा गोलंदाज ठरला होता. तेव्हा त्याने सहा सामन्यांत नऊ विकेट घेतल्या होत्या.
कोडिंग, कॉर्नेल आणि ओरॅकल
अमेरिकेचा हा माजी कर्णधार नेत्रा या टोपणनावानेही ओळखला जातो. त्याच्या लिंकडेनवरील प्रोफाइलनुसार तो व्यावसायिक क्रिकेटपटू असून ओरॅकलचा प्रिन्सिपल मेंबर ऑफ टेक्निकल स्टाफही आहे. कॉर्नेल विद्यापीठात शिक्षक सहाय्यक असणाऱ्या सौरभने सन २०१६मध्ये कम्प्युटर सायन्सची पदवी मिळवली आहे. त्याने सन २०१३मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.