26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणनरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार

९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार

Google News Follow

Related

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येण्यास सज्ज झाले आहे. यासाठी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. माहितीनुसार, ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला विविध देशांचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच इतरही अनेक लोक या भव्य अशा शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

हजारो मान्यवर या सोहळयाला उपस्थित असणार आहेत. सिने क्षेत्रातील मान्यवर, क्रीडापटू यांसोबतच शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणारे मजूर या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. तसेच वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वीही नरेंद्र मोदींनी असे हटके आणि अचंबित करणारे निर्णय घेतले आहे. सर्वसामान्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा योग्य सन्मान करण्याचे काम हे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत अनेकदा केले आहे.

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून ९ जून रोजी शपथ घेणार आहेत. भारताचे पंतप्रधान म्हणून मोदींची ही तिसरी टर्म असणार आहे, हा एक मोठा विक्रम असून जो पूर्वी फक्त भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होता. नरेंद्र मोदी यांना एनडीएचा नेता म्हणून निवडल्यानंतर शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, भुटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसनचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथही आपली उपस्थिती दर्शविणार आहेत.

हे ही वाचा:

‘राहुल गांधी निवडणुकीतील पराभव सहन करू शकले नाहीत’

संसद परिसरात बनावट आधार कार्ड वापरून घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!

यापूर्वी २०१४ साली सार्क (South Asian Association for Regional Cooperation) परिषदेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर २०१९ साली बिमस्टेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) देशांच्या प्रतिनिधींनी शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा