28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणचिराग पासवान ठरले मोदींचे ‘हनुमान’

चिराग पासवान ठरले मोदींचे ‘हनुमान’

पाचही जागा जिंकून मिळवले निर्भेळ यश

Google News Follow

Related

बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान हे बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची सर्वांत मोठी संपत्ती ठरू शकतात. त्यांच्या पक्षाने राज्यात लढवलेल्या पाचही लोकसभेच्या जागा जिंकल्या आहेत. तसेच, पासवान यांनी नेहमीच भाजपशी निष्ठा दाखवली आहे.पासवान यांनी स्वतःचे वर्णन ‘नरेंद्र मोदींचे हनुमान’ असे केले असून ते एनडीएसोबतच राहतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

चिराग पासवान यांची भाजपप्रणित एनडीएवरील निष्ठा अढळ आहे. त्यांचे काका पशुपती पारस यांनी लोकजनशक्ती पक्षापासून फारकत घेतली आणि एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री बनले तेव्हाही चिराग पासवान यांनी नरेंद्र मोदींविरुद्ध बंड केले नाही. पशुपती पारस हे चिराग पासवान यांचे वडील आणि लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे भाऊ आहेत. सन २०२३मध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर, लोजपमध्ये फूट पडली आणि पशुपती पारस यांनी चार खासदारांसह स्वतःचा गट स्थापन केला.

तथापि, चिराग पासवान यांच्या लोजप गटाला पाच जागा देण्याचा आणि बिहारमधील जागावाटप करारातून पशुपती पारस यांना वगळण्याचा भाजपचा निर्णय त्यांच्या बाजूने काम करत असल्याचे दिसते. चिराग पासवान यांच्या पक्षाने हाजीपूर, जमुई, खगरिया, समस्तीपूर आणि वैशाली या पाच जागा लढवल्या आणि या सर्व जागांवर विजय मिळवला.
एनडीएने सन २०१९च्या निवडणुकीत ३९ जागा मिळवल्या होत्या. त्यात यंदा घट झालेली दिसून येत आहे. ही संख्या ३० झाली आहे. मात्र पासवान यांच्या पक्षाने निर्भेळ यश मिळवले आहे.

हे ही वाचा:

रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!

‘हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष केंद्रित करा, डाव्या विचारसरणीला धक्का देणाऱ्या नव-हिंदुत्ववादींपासून अंतर ठेवा’

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने रचला इतिहास

विशेष म्हणजे, बिहारमध्ये भाजपने ४० पैकी अवघ्या १२ जागा जिंकल्या असल्या तरी चिराग पासवान यांनी आपली बाजू सोडलेली नाही.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वाईट कामगिरीमुळे निराश झालेल्या भाजपला बिहारमध्ये आशेची झुळूक दिसली आहे. बिहारमधील एनडीएचे घटक पक्ष जनता दल (संयुक्त) आणि लोजप या दोन्ही पक्षांनी या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बिहारमध्ये लोजपला ६.४७ टक्के मते मिळाली, ज्यात ६ टक्के दलित मतांचा समावेश आहे. या मतपेढीला आपल्याकडे खेचण्यात पासवान यांना यश मिळाले.

हाजीपूरमधून चिराग पासवान यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार शिवचंद्र राम यांचा एक लाख ७० हजार १०५ मतांनी पराभव केला.चिराग पासवान यांचे मेहुणे अरुण भारती जमुईमधून, पक्षाचे नेते राजेश वर्मा खगरियामधून, शांभवी चौधरी समस्तीपूरमधून आणि वीणा देवी वैशालीमधून विजयी झाले आहेत.

जमुईमध्ये अरुण भारती यांनी राजदच्या उमेदवार अर्चना कुमारी यांचा १,१२,४८२ मतांनी पराभव केला. समस्तीपूरमध्ये शांभवी चौधरी यांनी काँग्रेस उमेदवार सनी हजारी यांचा १,८७,२५१ मतांनी पराभव केला. खगरियामध्ये राजेश वर्मा यांनी माकप उमेदवार संजय कुमार यांचा एक लाख, ६१ हजार १३१ मतांनी पराभव केला. वैशालीमध्ये वीणा देवी यांनी राजदचे उमेदवार विजय कुमार उर्फ मुन्ना शुक्ला यांचा ८९ हजार ६३४ मतांनी पराभव केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा