31 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषउत्तराखंडमध्ये बेपत्ता ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, आणखी ५ दगावले!

उत्तराखंडमध्ये बेपत्ता ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, आणखी ५ दगावले!

खराब हवामानामुळे चुकले होते रस्ता, १३ जण सुखरूप!

Google News Follow

Related

उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली असून ती आता ९ वर पोहचली आहे.उत्तराखंडच्या सहस्त्रतालमध्ये ट्रेकसाठी एकूण २२ ट्रेकर गेले असता ते सर्व वाईट हवामानामुळे रस्ता भरकटून अडकले होते.या दुर्घटनेत काल ४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती.यामध्ये आता वाढ होऊन ती ९ वर गेली आहे.तर बचाव पथकाने १३ जणांना सुखरूप वाचवले आहे.

उत्तरकाशी जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला होता.अपघातानंतर १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. पाच मृतदेह आणण्यात आले आहेत, तर ४ मृतदेह आणणे बाकी आहे. मंगळवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास उत्तरकाशी आणि टिहरी आपत्ती व्यवस्थापन केंद्राला माहिती मिळाली की कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ ट्रेकर्स सहस्त्रताल ट्रॅकवरून परतत असताना कुफरी टॉप येथे खराब हवामानामुळे अडकले आहेत. यानंतर उत्तरकाशी आणि टिहरी प्रशासनाने आपापल्या जिल्ह्यातील एनडीआरएफ टीम्सना बचाव कार्यासाठी उपकरणांसह बेस कॅम्पवर पाठवले.बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरु केले आणि १३ जणांना सुखरून बेस कॅम्पवर आणण्यात आले तर यामध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार?

इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हल्ला; २७ जण ठार

अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज

अवघी २.५ टक्के मते, आठ जागांवर विजय

दरम्यान, ट्रॅकिंग एजन्सीचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक राजेश ठाकूर यांनी मंगळवारी संध्याकाळी प्रशासनाला कळवले की, हिमालयन व्ह्यू ट्रॅकिंग एजन्सी, मणेरी मार्फत मल्ला-सिल्लावर-कुष्कल्याण-सहस्त्रताल ट्रेकसाठी २२ सदस्यांची टीम गेली होती. ज्यामध्ये कर्नाटकातील १८ सदस्य, महाराष्ट्रातील एक सदस्य आणि तीन स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश आहे. २९ मे रोजी या टीमला सहस्त्रतालच्या ट्रेकिंग मोहिमेवर पाठवण्यात आले. ही ट्रॅकिंग टीम ७ जूनपर्यंत ट्रेक पूर्ण करून परतणार होती. दरम्यान, सहस्त्रतालला पोहोचत असतानाच खराब हवामानामुळे संघाचा रस्ता चुकला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा