उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. या विजयाने त्यांनी टीकाकारांची तोंडे बंद करून भाजपचा विश्वासही सार्थ ठरवला आहे. तिवारी यांनी सलग तिसऱ्यांदा एका लाखाहून अधिक फरकाने विजय प्राप्त केला आहे. ते सन २०१४मध्ये पहिल्यांदा उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. त्यानंतर ते सातत्याने येथून विजयी होत आहेत.
नवी दिल्लीतील सर्व सातही जागांपैकी उत्तर पूर्व मतदारसंघावर सर्वांच्या नजरा होत्या. येथून इंडिया गटाकडून काँग्रेसच्या कन्हैया कुमार यांना तिकीट देण्यात आले होते. कन्हैया कुमार हे चांगले वक्तेही होते. तसेच, युवा चेहरा असल्याने त्यांना फायदा होत असल्याचेही दिसत होते. ते सातत्याने मनोज तिवारी यांच्या विरोधात आक्रमक होते. त्यामुळे तिवारी यांची ही लढाई सोपी नसेल, असे म्हटले जात होते. परंतु निकालाने सर्व चित्र स्पष्ट केले आहे.
पहिल्या फेरीपासूनच आघाडी
दिल्लीमध्ये भाजपचे मनोज तिवारी एकमेव उमेदवार होते, ज्यांचे तिकीट कापले गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर भाजपने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचेही दडपण होते. परंतु योग्य रणनिती आणि विकासकामांसह प्रचाराच्या विविध माध्यमांमुळे त्यांना विजय प्राप्त झाला. मंगळवारी जेव्हा मतमोजणी झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर होते. सकाळी ११ वाजेपर्यंत तिवारी यांनी ३१ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार
मला मोकळं करा… राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!
नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!
‘चांगल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा’
उमेदवार मते
मनोज तिवारी (भाजप) ८,२४, ४५१
कन्हैया कुमार (काँग्रेस) ६,८५, ६७३
अशोक कुमार (बसप) १२,१३८
मतांनी विजय १,३७, ०६६
पक्षनिहाय मिळालेला मतटक्का
पक्ष २०२४ २०१९ २०१४
भाजप ५३.१० ५३.८६ ४५.२३
काँग्रेस ४४.१६ २८.८३ ३४.३०
अन्य २.७४ १३.५(आप) १६.३०(आप)