एनडीए ४०० जागा मिळवेल, असा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल उताणी पडले. याबाबत ‘ॲक्सिस माय इंडिया’ एक्झिट पोलचे प्रमुख, सेफोलॉजिस्ट प्रदीप गुप्ता यांनी विश्लेषण केले आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राबाबत सर्वेक्षण घेणाऱ्यांचा अंदाज चुकला, अशी कबुली त्यांनी दिली. या तीन राज्यांमध्ये भाजपने अंदाजापेक्षा कमी कामगिरी केली आणि इंडिया गटाच्या बाजूने दलित मतांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
‘आम्ही एनडीएसाठी ३६१-४०१ जागांचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे एनडीए सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. परंतु सध्या ही संख्या २९५ आहे. याचा अर्थ आम्ही आमच्या किमान जागांपेक्षा तब्बल ६६ जागांनी मागे आहोत. याला तीन राज्ये कारणीभूत आहेत, ज्यांचा आपण विचार केला पाहिजे,’ असे प्रदीप गुप्ता यांनी ‘इंडिया टुडे टीव्ही’शी बोलताना सांगितले.
‘उत्तर प्रदेशमध्ये, आम्ही सुमारे ६७ जागांचा अंदाज वर्तवला होता, परंतु या टप्प्यावर, एनडीएला ३८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आमचा अंदाज ३० जागांनी चुकला आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्ही भाजपला २६ ते ३२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता, परंतु त्यांना केवळ ११ जागा मिळाल्या, त्यामुळे आमच्या अंदाजापेक्षा १५ जागांचा फरक पडला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एनडीएला २८ जागांचा अंदाज होता, परंतु त्यांना २० जागा मिळाल्या, म्हणजे अपेक्षेपेक्षा आठ जागा कमी आहेत. या तीन जागांमध्ये ६० जागांचा फरक आहे,’ असे ते म्हणाले. गुप्ता म्हणाले, ‘आम्ही येथे पूर्णपणे चुकीचे होतो, आणि काय चूक झाली, याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.’
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात दलितांच्या मतांनी निर्णायक भूमिका बजावली, असे ते म्हणाले.
राममंदिर उद्घाटनाचा संदर्भ देताना त्यांनी नमूद केले की, जेव्हा जेव्हा धर्माभोवती चर्चा होते तेव्हा दलित त्यापासून दूर राहतात. शिवाय, आरक्षण आणि राज्यघटना बदलण्याचे आरोप यांसारख्या मुद्द्यांमुळे मतांमध्ये बदल घडून आला असेल. उत्तरांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह असल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोल घेणे, आव्हानात्मक होते. महाराष्ट्रात, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी कोसळली, ज्याचा ‘इंडिया’लाही फायदा झाला.
हे ही वाचा:
घोषणा ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?
पुण्यात हरले मोरे-धंगेकर, जिंकले मुरलीधर!
अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खणखणीत राणेंचे नाणे!
तथापि, गुप्ता यांनी नमूद केले की, एक्झिट पोल राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, तामिळनाडू आणि इतर राज्यांतील जागा क्रमांकांवर तसेच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार विधानसभा निवडणुकांमध्ये योग्य होता.