लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून एनडीएची सत्ता देशात येईल हे पक्के असले तरी काही ठिकाणी भाजपाला धक्कादायक पराभवांना सामोरे जावे लागले आहे. उत्तर प्रदेशात अयोध्येमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राम मंदिराच्या निर्माणामुळे काही महिन्यांपूर्वी अयोध्येचा कायापालट होऊन जगभर याची चर्चा होती.
अयोध्या ज्या मतदार संघात येते त्या फैजाबाद लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाचा विजय झाला. फैजाबाद भाजपाचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंह पराभूत यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी अयोध्यावासीयांची चांगलीच कान उघडणी केली आहे.
“ज्या सरकारने संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, नवीन विमानतळ दिले, रेल्वे स्टेशन दिले, ५०० वर्षांनंतर राम मंदिर बांधले, संपूर्ण मंदिर अर्थव्यवस्था केली, त्या पक्षाला अयोध्येच्या जागेवर संघर्ष करावा लागत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे खडेबोल सोनू निगम यांनी जनतेला सुनावले आहेत.
जिस सरकार ने पूरे अयोध्या को चमका दिया, नया एयरपोर्ट दिया, रेलवे स्टेशन दिया, 500 सालों के बाद राम मंदिर बनवाकर दिया, पूरी की पूरी एक टेंपल इकोनॉमी बनाकर दी उस पार्टी को अयोध्या जी सीट पर संघर्ष करना पड़ रहा है।
शर्मनाक है अयोध्यावासियों!
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) June 4, 2024
हे ही वाचा:
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खणखणीत राणेंचे नाणे!
अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !
मंडीच्या गादीवर ‘क्विन’च! कंगना रनौतकडून काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा परभव
उत्तर प्रदेशात विद्यामान योगी सरकारने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी राज्यातील माफिया गिरी मोडून काढली आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर पूर्ण झाले यानंतर सर्वत्र जगभरात याची चर्चा होती. ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केली होती. तसेच मंदिर निर्माणामुळे याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेवर झाला. पर्यटन वाढले होते, रोजगार निर्माण झाले होते. पायाभूत सुविधांमध्येही भर पडली होती. त्यामुळे अयोध्या येथून जनता भाजपाला कौल देईन अशी शक्यता होती. मात्र, जनतेने समाजवादी पार्टीला कौल दिला आहे.