बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही भाजपाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यानंतर कंगना हिने तिच्या पहिल्या निवडणुकीतच मोठा विजय मिळवला आहे. मंडी मतदार संघात कंगना हिच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना हिने विक्रमादित्य सिंह यांच्यावर ७३ हजार मतांनी मात केली आहे.
कंगना रनौत हिने पहिल्यांदाचं निवडूण आल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि जनतेचे आभार मानले आहेत. कंगना म्हणाली की, “आमचे नेता नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भाविष्य आता उज्वल असणार आहे,” असं मत कंगना रनौत हिने व्यक्त केले आहे.
कंगना रनौत हिने कॉंग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्यावर ७३ हजार मतांनी मात केली आहे. कंगना रनौत यांना ५,०३,७९० मते मिळाली आहत. तर, विक्रमादित्य सिंह यांना ४,३०,५३४ मतं मिळाली आहेत. कंगना यांच्या विजयानंतर मंडी मतदार संघात आनंदाचं वातावरण असून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
हे ही वाचा:
नरेश म्हस्के ठरले जायंट किलर, ठाण्यात राजन विचारेंना पाडले
सांगलीमध्ये मविआला दणका देत विशाल पाटलांनी उधळला गुलाल
इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत
कंगना रनौत हिने निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडेन, असं वक्तव्य केलं होते. त्यामुळे यांच्या विजयानंतर अभिनेत्री कंगना बॉलिवूड सोडणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तिच्या विजयानंतर तिच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.