लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळ (४ जून) सुरुवात झाली असून निकाल काय येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तत्पूर्वी पश्चिम बंगालमधील जाधवपूरमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.या स्फोटात ५ जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (३ जून) रात्री कोसीपोर पोलिस स्टेशन हद्दीतील चालताबेरिया येथे बॉम्बस्फोट झाला. येथे अवैध देशी बॉम्ब बनवण्याचे काम सुरू होते.बॉम्ब बनवताना हा स्फोट झाला असून या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी कोलकाता पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे.तसेच या देशी बॉम्बचा वापर कशाकरिता होणार होता याचाही तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा:
लोकसभा २०२४: मुंबईतून पीयूष गोयल, राहुल शेवाळे आघाडीवर
क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!
कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत
शैक्षणिक नैराश्यातून मुंबईतील ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या
दरम्यान, लोकसभा निवडणुकी पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.निकाल काय येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.