टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी करार संपल्यानंतर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आघाडीवर आहे. भारताचे माजी सलामीवीर असणाऱ्या गौतम गंभीर यांनीही देशाच्या राष्ट्रीय संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जागतिक टी २० स्पर्धेनंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे.
त्यामुळे बीसीसीआय आगामी सामन्यांसाठी संघाला मार्गदर्शन करण्याकरिता योग्य पर्यायाच्या शोधात आहेत,‘मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा दुसरा मोठा सन्मान नाही. तुम्ही १४० कोटी भारतीयांचे आणि जगभरातील लोकांचे प्रतिनिधित्व करता,’ असे ४२ वर्षीय गंभीर अबू धाबीमधील एक कार्यक्रमात म्हणाले. माजी कर्णधार सौरव गांगुलीने गंभीरला भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून पाठराखण केली होती. ‘तो एक चांगला उमेदवार आहे,’ असे गांगुली म्हणाले होते.
हे ही वाचा:
एल्विश यादवकडून आपसमर्थक यूट्यूबर ध्रुव राठी याचे लागेबंधे उघड!
निवडणूक आयोगाने मान्य केली चूक म्हणाले, उन्हाळ्यापूर्वी निवडणूका व्हाव्यात!
उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषद भोवणार, कारवाईचे आदेश
राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!
गंभीरने नुकतेच अबुधाबी येथील मेडीओर हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांच्या समूहाला संबोधित केले. सत्रादरम्यान, एका विद्यार्थ्याने गंभीरने भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याची आणि विश्वचषक जिंकण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याच्या शक्यतेबद्दल चौकशी केली. या प्रश्नाच्या उत्तरात गंभीर म्हणाला, ‘जरी अनेकांनी मला हा प्रश्न विचारला असला तरी मी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, परंतु मला आता तुम्हाला उत्तर द्यावे लागेल.
१४० कोटी भारतीय आहेत जे भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही खेळायला आणि त्यांचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली तर भारत विश्वचषक जिंकेल. निर्भय असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,’ असे गंभीर म्हणाले. गंभीर हे युएईच्या वैयक्तिक दौऱ्यावर असताना मेडीओर हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिन विभागाला त्यांनी भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी अबूमधील विविध अकादमीतील युवा क्रिकेटप्रेमींशी संवाद साधला. ‘एक सुरक्षित ड्रेसिंग रूम ही एक आनंदी ड्रेसिंग रूम असते आणि एक आनंदी ड्रेसिंग रूम जिंकलेल्या ड्रेसिंग रूममध्ये परावर्तित होते. केकेआरमध्ये मी फक्त याच मंत्राचे पालन केले. देवाच्या कृपेने ते प्रत्यक्षात कामी आले,’ असे गंभीर म्हणाले.