१ जून रोजी युट्युबर एल्विश यादव याने युट्युबर आणि प्रचारक ध्रुव राठी याच्या विश्वासार्हतेला आव्हान देणारा एक चांगला अभ्यासपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. राठी हा भारतविरोधी प्रचारात गुंतला असून केवळ राजकीय पक्षांशीच नाही तर भारतविरोधी स्वयंसेवी संस्था आणि परदेशी संस्थांशीही तो संलग्न आहे, हे निदर्शनास आणण्यासाठी यादव याने अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. हा व्हिडिओ एल्विशचे सहकारी विजय पटेल (विजय गजेरा) आणि इंजिनीअर रिव्हल्स (गौरव सिंग) यांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे.
एल्विश यांनी निदर्शनास आणून दिले की जरी ध्रुव राठी हा तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा तो भविष्यात कोणत्याही पक्षात सामील होणार नाही, असा दावा करत असला तरी प्रत्यक्षात, आम आदमी पार्टी (आप) सोबत त्यांचा दीर्घकाळचा संबंध आहे. ‘ध्रुव राठी यांनी ‘आप’ आयटी सेलसाठी काम केले. ७ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा व्हिडिओ बनवला आणि ‘आप’ला पाठिंबा दिला होता.
राठी विरुद्धच्या त्याच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी, एल्विशने ‘आप’ च्या अधिकृत पेजवर प्रकाशित व्हिडिओ आणि पोस्टचे स्क्रीनशॉट दाखवले आहे. ध्रुव राठीच ‘पाच साल केजरीवाल’ हे गाणे घेऊन आला होता, असे एल्विशने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच, ’१२ जानेवारी २०१७ रोजी, ‘आप’च्या सोशल मीडिया प्रमुखाने ध्रुव राठी त्यांच्या संशोधन टीमचा भाग आहे, असे म्हटल्याचे एल्विशने नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच ध्रुव राठीचा एक दिशाभूल करणारा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल न्यायालयात माफीही मागितली, ज्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने बदनामीकारक मजकूर रिट्विट करणे हे मानहानीकारक आहे, असे म्हणत त्यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्यास नकार दिला.
हे ही वाचा:
राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!
अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका नाहीच!
कन्याकुमारीमधील ध्यानधारणेचा अनुभव सांगत नरेंद्र मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोड मॅप
विवान कारुळकरच्या सनातन धर्मावरील पुस्तकावर ब्रिटन राजघराण्याची मोहोर
अर्धवट, दिशाभूल करणारे व्हिडीओ
एल्विशने निदर्शनास आणून दिले की, राठी हा निवडक वार्तांकनेच करतो. तो अर्धे सत्य वापरतो आणि निवडक डेटा आणि तथ्ये सादर करतो. ‘राठी यांनी आप आणि भाजप नेत्यांची तुलना केली आणि सोमनाथ भारती आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या प्रमुख आप नेत्यांवरील प्रलंबित खटल्यांकडे दुर्लक्ष करताना आप नेत्यांवर शून्य गुन्हेगारी खटले दाखवले,’ असा युक्तिवाद एल्विशने केला आहे. राठीने त्याच्या व्हिडिओंमध्ये सादर केलेला डेटा केवळ दिशाभूल करणारा नाही तर अपूर्ण देखील आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर पक्षपाती विधाने केली जातात, असेही त्याने सांगितले.
कथित विदेशी कनेक्शन
एल्विशने राठीचे व्हिडिओ आणि हर्ष मंडरच्या सोशल मीडियावरील पोस्ट यांचा सुस्थापित संबंध कसा आहे, हे तपशीलवार सांगितले. त्याचे बरेच व्हिडिओ जसे की, सीएए /एनआरसी आणि इतर मुद्द्यांवर मंडरने त्याच विषयावर सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या दोन ते तीन दिवसांत प्रकाशित झाले. एल्विश यादव म्हणाला, ‘सोनिया गांधींच्या सल्लागार समितीचा भाग असलेला हर्ष मंडर हिंदूंच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्यात गुंतला आहे.’ एल्विशने मंडरच्या पोस्ट आणि राठीच्या व्हिडिओंमधील संबंध दाखवून दिला. ‘१४ डिसेंबर २०१९ रोजी हर्ष मंडरने सीएए आणि एनआरसीबद्दल ट्विट केले आणि तीन दिवसांनंतर ध्रुव राठीने त्याच विषयावर एक व्हिडिओ जारी केला, चुकीची माहिती पसरवली,’ असा दावा एल्विशने केला आहे.
राठी आणि आप कार्यकर्ता आदिल अमान यांचा संबंध
या दोघांनी मिळून ‘आप’चे फेसबुक पेज चालवले. शिवाय, आदिल अमान जर्मनीला स्थलांतरित झाला आहे आणि तेथून काम करतो. आदिल अमान हा देखील हर्ष मंडरशी जोडला गेला आहे. २०२०च्या हिंदूविरोधी दिल्ली दंगलीतील एका मोठ्या कटाच्या खटल्यातील मुख्य आरोपी उमर खालिदशीही त्याची मैत्री होती. जॉर्ज सोरोसने भारतविरोधी प्रचारात अब्जावधी डॉलर्स कसे उधळले याकडे एल्विशने लक्ष वेधले आणि जॉर्ज सोरोस उपाध्यक्ष असणारी ओपन सोसायटी फाउंडेशन भारत जोडो यात्रेचा एक भाग होती.
हर्ष मंडर जॉर्ज सोरोसच्या या संस्थेशी संबंधित होता. इल्विशने निदर्शनास आणून दिले की, आदिल अमानने एकदा निषेध मोर्चा आयोजित केला होता ज्याचा प्रचार राठीने केला होता. काही दिवसांतच, ब्राझीलच्या दूतावासाबाहेर आंदोलन झाले. निदर्शनात सहभागी झालेले “विद्यार्थी” स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीव्हायएफआय) शी संबंधित होते. दोघेही डाव्या पक्षांशी संबंधित आहेत. आदिल अमानने आपल्या एका फेसबुक कमेंटमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हत्येची आशा व्यक्त केली आहे. आणखी एका कमेंटमध्ये त्यांनी रामायण मालिकेची तुलना पॉर्न फिल्मशी केली होती.
भारतविरोधी प्रचाराचा आरोप
एल्विश यादवने ध्रुव राठी यांच्यावर भारताविषयी फेरफार केलेला मजकूर सादर केल्याबद्दल टीका केली. सीएए आणि एनआरसीवरील राठीच्या व्हिडिओंनी चुकीची माहिती कशी पसरवली आणि भारताच्या नेतृत्वाची नकारात्मक प्रतिमा कशी निर्माण केली, याकडे त्याने लक्ष वेधले. शिवाय, अलीकडील व्हिडिओमध्ये, त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरसारख्या हुकूमशहाशी तुलना केली जी चुकीची माहिती होती.