लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले असून या निवडणुकीचा उद्या (४ जून) निकाल लागणार आहे.निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशासह जगाचे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या निकालापूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भगवान रामललाचा विशेष आशीर्वाद आहे. त्यामुळेच ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत.
राम मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, ४ जूनला निवडणुकीचे निकाल येतील आणि तेव्हाच निश्चित होईल की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत.आचार्य म्हणाले की, प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्तेच पार पडला.प्रभू रामलल्लाचा आशीर्वाद आणि कृपा पंतप्रधान मोदींवर आहे.पुजारी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी निवडणुका जिंकतील. ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ते संकल्प पूर्ण करतील, आमचे आशीर्वाद आहेत.
हे ही वाचा:
मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला
राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे
अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!
रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!
दरम्यान, तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू राम अयोध्येत विराजमान झाले.२२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू रामलल्लाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पडला.विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी ११ दिवसांचा विशेष विधी देखील केला होता.रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण होईपर्यंत पंतप्रधान मोदी जमिनीवर झोपले होते.सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव यांनी पंतप्रधानांचा उपवास सोडवून घेतला.आचार्य सत्येंद्र दास हे ३३ वर्षांपासून मुख्य पुजारी म्हणून रामललाची पूजा करत आहेत. ते मूळचे अयोध्येचे रहिवासी आहेत.