31 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरदेश दुनियाभारतात मोदी सरकार येणार समजताच पाकिस्तान चिंतेत; पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी दिला...

भारतात मोदी सरकार येणार समजताच पाकिस्तान चिंतेत; पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी दिला इशारा

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव इजाज चौधरी म्हणतात, मोदींचे धोरण पाकिस्तानसाठी आक्रमक असेल

Google News Follow

Related

भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले असून निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. दरम्यान, एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असून यातून भारतात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी स्पष्ट बहुमताने सलग तिसऱ्यांदा सत्तेत परत येऊ शकतात. या एक्झिट पोलची चर्चा भारताबरोबरच शेजारील देशांमध्येही केली जात आहे.

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास शेजारी देशांप्रती त्यांचे काय धोरण असेल याची चर्चा पाकिस्तानात सध्या सुरू आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव इजाज चौधरी यांनी यावर भाष्य केले आहे. एका टीव्ही चॅनलवर निवडणूक निकाल आणि भारतातील नवीन सरकार या विषयावरील चर्चेदरम्यान त्यांनी म्हटले की, भारताच्या निवडणुकीचा निकाल अद्याप आलेला नाही, परंतु एक्झिट पोलवरून असे दिसते की नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येत आहेत. जर नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीकडे पाहिले, तर असे दिसून येते की ते त्या आश्वासनांवर आणि केलेल्या दाव्यांवर पुढे जातात. यावेळी ते सरकारमध्ये आले तर दोन गोष्टी विशेष होतील, एक म्हणजे भारत हिंदू राष्ट्र बनणे आणि दुसरी पाकिस्तानशी संघर्ष,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

चौधरी यांनी असेही म्हटले आहे की, “नरेंद्र मोदींच्या ट्रॅक रेकॉर्डवरून असे दिसून येते की ते निवडणूक जाहीरनामा आणि दावे लागू करतात. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र बनवणे हे त्यांच्या सरकारचे यावेळचे एक ध्येय असेल असे वाटते. दुसरे म्हणजे ते पाकिस्तानबाबत आक्रमक धोरण स्वीकारतील, ज्याचा उल्लेख ते ‘घुसकर मारेंगे’ असा करतात.”

हे ही वाचा:

मोदी ३.O चे परिणाम शेअर बाजारात; सेन्सेक्स २६२१ वर उघडला

राहुल गांधी म्हणतात एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे

अजबच! उष्म्यामुळे चोर एसी लावून झोपला, पकडला गेला!

रविना टंडनला लोकांनी घेरले, तिच्या वाहनचालकाने धडक दिल्यामुळे झाला राडा!

इजाज चौधरी पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी कलम ३७० चा उल्लेख केला आणि सर्वांना दणका देत ते हटवलेही. यावेळी स्पष्टपणे त्यांचे लक्ष्य हिंदू राष्ट्र आहे. दुसरे म्हणजे, ते शेजारी राष्ट्रांसाठी विशेषतः पाकिस्तानसाठी आक्रमक असतील. ते पाकिस्तानच्या बाबतीत ‘घुसके मारेंगे’ या त्यांच्या अजेंड्यावर पुढे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानने पूर्ण तयारी करायला हवी, असा इशारा इजाज चौधरी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा