भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा पूर्व कप्तान आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी याच्या आई वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांनाही कोरोनाची लागण होऊन ते झारखंडमधील रुग्णालयात दाखल झाले आहेत.
देशभरात सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. महेंद्र सिंग धोनी आयपीएलमध्ये असतानाच त्याच्या आई-वडिलांना कोरोना झाल्याचे कळले आहे. त्यांना रुग्णालयात भरती केले असले तरीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील कळले आहे. त्या दोघांना रांचीतील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
राज्यात आणीबाणी लावा- काँग्रेस आमदाराचेच मोदींना पत्र
ठाकरे सरकारने सूडाच्या राजकारणाचा कळस गाठला आहे
श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
डोंबीवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे निधन
धोनीच्या आई-वडिलांची ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असल्याने काळजीचं कोणतंही कारण नाही. पल्स रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सुदैवाने कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
झारखंडमध्ये मंगळवारी ४ हजार ९६९ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यात कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७२ हजार ३१५ वर गेली आहे. आरोग्य विभागाने काल रात्री जाहीर केलेल्या कोव्हिड बुलेटिननुसार राज्यात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ५९० इतकी आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी ८५.६० टक्क्यांच्या तुलनेत ७९.८४ टक्क्यांपर्यंत खाली गेले आहे. तर झारखंडमधील मृत्यूचे प्रमाण ०.८९ टक्के इतके आहे.